Install HealthPhone Poshan Mobile App in Marathi from Google Play https://play.google.com/store/apps/de... - Download videos for Laptop, Tablet, SmartPhone, BasicPhone from http://iap.healthphone.org/marathi/
मराठी Marathi | Poshan 4 | कुपोषण टाळण्याची प्रतिज्ञा करा
महिलांनी शपथ घ्यायची आहे की त्यांच्या सुना गर्भवती असताना, ते तिच्या आरामाची पूर्ण काळजी घेतील, तिला हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी, दूध आणि फळं यासारखे पोषक अन्न भरपूर प्रमाणात देतील. ते आयोडीनयुक्त मीठ घालून शिजवलेले अन्न तिला देतील आणि आयर्न फॉलिक अॅसिड गोळ्या तिला देतील.
तरुण पुरुषांनी शपथ घ्यायची आहे की गर्भधारणेच्या दरम्यान ते आपल्या पत्नींची सर्वाधिक काळजी घेतील. ती वेळेवर जेवेल आणि तिला भरपूर आराम मिळेल याची खात्री ते करतील. सहाव्या महिन्यापासून पुढे, बाळाला विविध प्रकारचे घरी शिजवलेले पोषक अन्नासोबत स्तनपान देखील चालू राहील याची खात्री ते करतील.
महिला शपथ घेतील की त्या आपल्या नवजात बाळांना पहिले घट्ट दूध (कोलोस्ट्रम) पाजतील, आणि पहिले सहा महिने त्या बाळाला केवळ स्तनपान करवतील. बाळ सातव्या महिन्याचं होईल तेव्हा, स्तनातील दुधासोबत, ते बाळाच्या आहारामध्ये घरी शिजवलेलं आरोग्यदायक अन्न समाविष्ट करतील.
18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी एक माता होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टिने तयार नसते. अशावेळी, तिचे बाळ कुपोषणाचे बळी ठरु शकते. म्हणूनच आपली मुलगी किमान 18 वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न करण्याचा विचार करु नका.
पालकांनी शपथ घ्यायची आहे की ते आपल्या मुलीचं लग्न ती 18 वर्षे वयाची होईपर्यंत करणार नाहीत. आणि याद्वारे तिचं भविष्यातील बाळ कुपोषणापासून सुरक्षित राहील याची खात्री ते करतील.
तरुण पुरुषांनी शपथ घ्यायची आहे की ते 18 वर्षांखालील मुलीशी लग्न करणार नाहीत जेणेकरुन त्यांचं भविष्यातील बाळ कुपोषणापासून सुरक्षित राहील.
सरपंचाने (गावाची महिला प्रमुख) शपथ घ्यायची आहे की तिच्या गावातील 18 वर्षांहून कमी वयाच्या कोणत्याही मुलीच्या लग्नास प्रतिबंध केला जाईल, जेणेकरुन तिच्या गावातील एकही मूल कुपोषणाचा बळी ठरणार नाही.
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.
सर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.
.