Install HealthPhone Poshan Mobile App in Marathi from Google Play https://play.google.com/store/apps/de... - Download videos for Laptop, Tablet, SmartPhone, BasicPhone from http://iap.healthphone.org/marathi/
मराठी Marathi | Poshan 1 | कुपोषणाची चिन्हे, परिणाम आणि प्रतिबंध
नेहमी आजारी पडणारी, सहजपणे दमणारी आणि समजण्यात मंद असलेल्या मुलांना कुपोषणाची समस्या असू शकते.
मूल गर्भात असल्यापासून ते वयाच्या दोन वर्षांपर्यंत एखाद्या लहान मुलाला कुपोषणाचा विशेष धोका असतो. एकंदरीत दीर्घकाळ वाढण्यासाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. कुपोषणाची सुरुवात जन्माच्या आधीपासून होते, सामान्यतः ते मूल पौगंडा आणि प्रौढ अवस्थेत येईपर्यंत ती चालू राहते आणि अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकते. ही समस्या बरेचदा दुरुस्त होऊ शकत नाही. आईचं आरोग्य, मुलाचं आरोग्य आणि जिवंत राहणं यांना धोकादायक ठरणारी ही वाढ आणि विकासाची समस्या टाळण्यासाठी, कुपोषण, जीवनचक्रामध्ये शक्य तितक्या लवकर टाळणं अतिशय महत्वाचं असतं.
मेलेलं रोपटं डेरेदार झाडामध्ये पुन्हा जिवंत होऊन माती, पाणी, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश यासारख्या योग्य काळजी आणि पोषणाच्या विना सामान्यपणे वाढू शकत नाही, तसंच योग्य निगा आणि पोषण नसेल तर एक लहान मूल देखील सुदृढ प्रौढ होऊ शकत नाही.
मातीचं भांड तुटलं-फुटलं असेल तर ते पूर्वीसारखं करता येत नाही, त्याप्रमाणं आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कुपोषणानं ग्रस्त एखाद्या लहान मुलाची तब्येत पूर्ववत करता येत नाही.
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.
सर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.
निर्मितीः महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, युनिसेफ आणि अन्य विकास भागिदारांच्या सक्रीय पाठिंब्याने.
.