http://www.framingtheworld.com/m2z.html
http://www.faithfulwordbaptist.org
4000 वर्षांपूर्वी, मेसोपोटेमिया मध्ये परमेश्वराने अब्राहमला दर्शन दिले आणि त्याला म्हणाला, “देशाबाहेर जा, नातेवाईकांपासून दूर जा, बापाच्या घरापासून दूर मी दाखवीन त्या प्रदेशात जा, मी त्याचे एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. " अब्राहमने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि तो समृद्ध कनान प्रदेशात येऊन आपला पुत्र इझाक आणि नातू जाकोब, ज्याचे नंतर नामकरण करण्यात आले "इस्राएल ", यांच्या सोबत राहू लागला.
पुढे कनान देशात देशात दुष्काळ पडल्याने इस्राएल आणि त्याचे 12 पुत्र इजिप्तला गेले आणि तिथे त्यांची भरभराट होऊन त्यांचे शक्तिशाली राष्ट्र बनले. इजिप्तच्या लोकांना या अंतर्गत शक्तिशाली इस्राएल राष्ट्राचा धोका वाटू लागला, म्हणून त्यांना बंदी बनवून त्यांचे जीवन खडतर गुलामगीरीत लोटले गेले. इजिप्त मध्ये 430 वर्षानंतर, मोझेसने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढले आणि तांबडा समुद्र पार करून अरेबियाला नेले, सीनाय पर्वतावर त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र प्राप्त केले.