Install HealthPhone Poshan Mobile App in Marathi from Google Play https://play.google.com/store/apps/de... - Download videos for Laptop, Tablet, SmartPhone, BasicPhone from http://iap.healthphone.org/marathi/
मराठी Marathi | Poshan 3 | स्तनपान आणि सहा महिन्यांनंतरचे अन्न
जन्मानंतर एक तासाच्या आत, मातेचे घट्ट, पहिले दूध (कोलोस्ट्रम) बाळाला दिले पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. मातेचे पहिले दूध सर्वोत्कृष्ट असते, ते फेकून देऊ नका आणि बाळाला ते मिळेलच याची खात्री करा.
कोलोस्ट्रम अत्यावश्यक आहे कारण पुढील काही दिवसांना बाळाला जे पक्व दूध मिळेल त्यासाठी ते बाळाच्या पाचन संस्थेला तयार करतं. कोलोस्ट्रममध्ये झिंक, कॅल्शियम आणि जीवनसत्वांसारखे समृद्ध पोषक घटक असतात.
जन्मानंतर पहिले सहा महिने, बाळाला केवळ मातेचे दूधच द्यावे आणि दुसरे काही नाही, अगदी पाणी सुद्धा नाही. 6 महिने केवळ स्तनपान करवल्याने बाळपणात होणाया अतिसार किंवा न्यूमोनियासारखे सामान्य आजारांपासून संरक्षण मिळतं आणि बालमृत्युचं प्रमाण कमी राहतं, तसंच आजारपणात लवकर बरं होण्यात मदत मिळते.
सातव्या महिन्यापासून, स्तनातील दूध त्या बाळाच्या पोषणात्मक गरजा भागविण्यासाठी पुरेसं नसतं. मातेच्या दुधासोबत पोषक विविधांगी आहार द्या. वेळेवर, पुरेसा, वारंवार आणि योग्य पूरक आहार सुरु करावा. सहाव्या महिन्यानंतर, आपण बाळाला दिवसातून किमान 3-4 वेळा भरवावे. आणि स्तनपान करणे चालू ठेवण्यासही विसरु नका.
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.
सर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.
निर्मितीः महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, युनिसेफ आणि अन्य विकास भागिदारांच्या सक्रीय पाठिंब्याने.
.