प्रेससाठी YouTube

तुम्‍हाला हवे असलेले व्हिडिओ आणि आकडेवारी तसेच त्यांना श्रेय कसे द्यावे व त्‍यांचे प्रसारण कसे करावे याबद्दलची मार्गदर्शक तत्‍त्‍वे त्वरित शोधा.

YouTube essentials

प्रेसमध्‍ये YouTube व्हिडिओंचा अ-व्‍यावसायिक वापर

मालकी आणि श्रेय

साइटवर दिसण-या आशयाचे हक्‍क YouTube चॅनेल मालकाकडे असतात. तुम्‍हालाही दाखवायची आणि/किंवा संदर्भ द्यायची इच्छा अाहे असा व्हिडिओ मिळाल्‍यास तुम्‍ही थेट चॅनेल मालकाशी संपर्क साधावा असे आम्ही सांगतो. प्रसारण किंवा वेबकास्‍टमध्‍ये YouTube व्हिडिओ दाखवताना, कृपया आशय मालकाचे वापरकर्तानाव किंवा खरे नाव दाखवून इन-स्‍क्रीन आणि तोंडी अशा दोन्ही पद्धतींनी उल्लेख करा.

YouTube चॅनेल मालकाशी संपर्क साधणे

YouTube वापरकर्ता नावावर क्लिक केल्‍यावर तुम्‍हाला वापरकर्त्‍याच्‍या चॅनेलच्‍या मुख्‍य पेजवर नेले जाईल. तिथून, तुमच्‍या स्‍वत:च्‍या Google खात्‍यामध्‍ये लॉग इन करताच तुम्ही चॅनेल मालकाशी संपर्क साधण्‍यासाठी YouTubeची ऑन-साइट मेसेजिंग सिस्‍टम वापरू शकता. फक्त "बद्दल" टॅबवर क्लिक करा, नंतर "संदेश पाठवा" निवडा आणि इलेक्‍ट्रॉनिक फॉर्म भरा.

YouTubeवर काय चालले आहे

कोणत्‍याही अतिरिक्‍त प्रेस चौकशींसाठी, संपर्क साधा press@google.com