Song - Sang Sang Naav Sang
Movie - Maratha Tituka Melavava (1964)
Lyrics - Shanta Shelke
Music - Anandghan (Lata Mangeshkar)
Singer - Asha Bhosle, Hridaynath Mangeshkar
गीत - सांग सांग नाव सांग
चित्रपट- मराठा तितुका मेळवावा (१९६४)
गीतकार - शांता शेळके
संगीत - आनंदघन (लता मंगेशकर)
स्वर - आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर
गीत - सांग सांग सांग सांग
काय रं ?
तुजं नाव, तुजं गाव, तुजं नाव, तुंज गाव
नाव सांग सांग सांग गाव सांग !
चाललीस तुरुतुरु, अढि नगं मनी धरू
नाव सांग सांग सांग गाव सांग !
जा रं !
गोडवानी नगं हसू, नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थांब !
व्हट उगडुन सखू माज्यासंगं तू बोल
शब्दाशब्दाला घे मोत्यापवळ्याचं मोल
तुज्या मागं मागं आलो, तुज्यापायी येडा जालो
नाव सांग सांग सांग गाव सांग !
नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपून जपून तालेवाराची लेक
तुज्या डोळियाचं बान, झाला कासावीस परान
नाव गाव नगं पुसू थांब थांब थांब !
Thank you for another beautiful Marathi gem missing from youtube.
sgtalageri 2 years ago