मुंबई वाय धीस कोलावेरी डी म्हणत रातोरात तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला रजनीकांतचा जावई धनुष आता हिंदी चित्रपटात आपले भविष्य आजमावणार आहे. त्याने नुकताच आपला पहिला वहिला चित्रपट साईन केला आहे.
दाक्षिणात्या चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आणि गायक धनुष दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
रांझणा या रोमॅंटिक चित्रपटात तो भूमिका करतोय. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये होणार आहे. थोडक्यात काय तर धनुष आता छोरा गंगा किनारेवाला होणार आहे. सिनेमाची गरज ओळखून धनुषला घेतल्याचे आनंद यांनी सांगितले.
Link to this comment:
All Comments (0)