मुंबई - अलीकडे चित्रपटापेक्षा त्याच्या प्रमोशनवरच अधिक भर दिला जातो. त्यासाठी विविध कल्पना लढविल्या जातात. अशीच एक वेगळी कल्पना एका चित्रपट निर्मात्याने लढविली आहे.
हा आहे अर्णब बागची.. वय वर्षे 31..रंग गव्हाळ.. उंची पाच फूट 11 इंच.. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजीनियर.. जर तुम्हाला याच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाली, तर त्याची पत्नी विद्या बागचीला कळवा. आपल्या पतीच्या शोधात ती लंडनहून कोलकत्यात आली आहे.
मुंबईतील वांद्रे ते अंधेरीदरम्यान ठिकठिकाणी अशी पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. ही पोस्टर्स पाहून आपण यांना पाहिलत का, याचीच आठवण होते. विद्या बालनची भूमिका असलेला हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात विद्या सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या लॉंचमध्येही ती अशाच गेटअपमध्ये दिसली होती. सुजोय घोष या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
Link to this comment:
All Comments (0)