Song - Asa Kasa Khatyal Tujha Kanha
Movie - Bhau Beej (1955)
Lyrics - Kavi Sanjeev
Music - Vasantkumar Mohite
Singer - Asha Bhosle
Actor - Sulochana
गीत - असा कसा खट्याळ तुझा कान्हा
चित्रपट-भाऊ-बीज (१९५५)
गीतकार-कवि संजीव
संगीत-वसंतकुमार मोहिते
स्वर-आशा भोसले
कलाकार - सुलोचना
गीत - गोकुळीच्या ग आम्ही नारी, छळितो बाई तुझा मुरारी
खोड्या करितो ग अमुच्या भारी
असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मध्यरात्री आला चोरावाणी, यांची बांधिली दाढी आणि माझी वेणी
ओढाओढीत मोडल्या आमच्या माना की बाई आमच्या माना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मथुरेची हा अडवितो वाट, ओढितो दह्या दुधाचे ग माठ
भर रस्त्यात घाली धिंगाणा की बाई धिंगाणा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
Link to this comment:
All Comments (0)