Song - Tujhi Prit Aaj Kashi Smaru
Movie - Aparadh (1969)
Lyrics - Madhusudan Kalelkar
Music - N. Datta
Singers - Asha Bhosle
Actors - Ramesh Dev, Seema
गीत - तुझी प्रीत आज कशी स्मरू
चित्रपट -अपराध (१९६९)
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्. दत्ता
स्वर - आशा भोसले
कलाकार - रमेश देव, सीमा
गीत - तुझी प्रीत आज कशी स्मरू ?
तुझी प्रीत, प्रीत ना राहिली
तुझे गीत, गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू ?
तुझे शब्द ते ना राहिले
नाते कधि ते संपले
उरली अता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू ?
तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हातांविना मी त्या कशि
रे तोल माझा सावरू ?
होतास तू माझा कधि
होते तुझी मी एकदा
अश्रूत भिजल्या पाकळ्या
मी ओंजळीत कशा धरू ?
Link to this comment:
All Comments (0)