Song - Dole Majhe Tyat Tujhe Roop
Movie - Lagnala Jato Mi (1960)
Lyrics - Madhusudan Kalelkar
Music - Sudhir Phadke
Singer - Suman Kalyanpur, Sudhir Phadke
Actors - Raja Gosavi
गीत - डोळे माझे, त्यात तुझे रुप
चित्रपट - लग्नाला जातो मी (१९६०)
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुमन कल्याणपूर, सुधीर फडके
कलाकार - राजा गोसावी
गीत - डोळे माझे, त्यात तुझे रूप कसे ?
ओठ माझे, त्यात तुझे गीत कसे ?
चित्त माझे, त्यात तुझी प्रीत कशी ?
वीज इथे, आग तिथे, सांग कशी ?
नीज माझी, त्यात तुझे स्वप्न कसे ?
चाल माझी, त्यात तुझा डौल कसा ?
स्पर्श तिथे, कंप इथे, सांग कसा ?
गाल माझे, त्यात तुझे रंग कसे ?
चंद्र माझा, त्यात तुझा डाग कसा ?
देह इथे, प्राण तिथे, सांग कसा ?
चाल माझी, त्यात तुझे सूर कसे ?
श्वास माझा, त्यात तुझी ओढ कशी ?
चोर तिथे, चोरी इथे, सांग कशी ?
वेध माझा, त्यात तुझे तीर कसे ?
Link to this comment:
All Comments (0)