निळ्या नभाखाली आज दोन जीव एक चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख क्षणांचे ग दिवे होती, रोज तुझ्या संग ऋतू बघ लाजुनिया, बदलतील रंग अबोल शब्दांचा, माझ्या अंगी हा शहारा हात येती हातात, होई तोच ग किनारा श्वास तुझा गुलाबाचा, भिनला मनात देह असे चिंब भिजले, कोवळ्या उन्हात खोल माझ्या अंतरात, बांधले तुझेच घर तुझ्या प्रेमाची ती हाक, जसा पहाटेचा स्वर दोन डोळ्यांच्या डोहात, मी असा हरवतो काजळयांच्या काठावरती, पुन्हा कसा वरतो
This has been flagged as spam show
vychaudhari 3 months ago
Comment removed
vychaudhari 3 months ago